सात दिवसांत युतीमध्ये दुरावा: विश्वासघाताचा आरोप, आश्वासन न पाळल्याचा दावा
काँग्रेसने दिलेला शब्द पाळला नाही..

- वंचित आणि कॉंग्रेसची युती सात दिवसातच तुटली.
- कॉंग्रेसवर विश्वासघाताचा आरोप.
- बहुजन समाजात राजकीय फसवेपट आणि विकासात तुट याचा तिटकारा.
- वंचितचा स्वतंत्र लढण्याचा निर्णय कॉंग्रेससाठी धोकादायक ठरू शकतो..
चिखली : चिखली नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची नुकतीच जाहीर झालेली युती केवळ सात दिवसांतच तुटली आहे. वंचितचे शहराध्यक्ष बाळासाहेब भिसे यांनी नगराध्यक्षपदाचा अर्ज कायम ठेवत काँग्रेसवर आश्वासन न भरण्याचा आणि “शेवटपर्यंत झुलवत ठेवले” असा आरोप केला आहे. काँग्रेसने शिवसेना (उद्धव) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटांना जागा दिली, मात्र वंचितला एकही जागा न दिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.भिसे म्हणाले की, ज्या ठिकाणी वंचितची ताकद आहे त्या प्रभागांमध्ये फक्त नगरसेवक जागांची अपेक्षा होती, परिणामी त्यांना काँग्रेसने दिलेला शब्द पाळला नाही. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने नगराध्यक्षपदासह पाच नगरसेवक जागांवर स्वतंत्र लढत जाहीर केली आहे.
यात बहुजन समाजात “विश्वासघाताचा” आरोपही करण्यात आला आहे. या घटनेमुळे बहुजन समाजामध्ये असा संदेश गेला आहे की अनुसूचित जाती व अल्पसंख्याक समुदायातील गरीब लोकांना राजकीय फायद्यासाठी फसवले जाते आणि विकासाच्या मूळ वाटेवर येण्यापासून दूर ठेवले जाते. असे आरोप विशेषत: बोन्द्रे यांच्या षडयंत्रांवर केले जात आहेत, ज्यांनी या समाजाचा विरोध केला आहे.
सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद निवडणूकात अनेक राजकीय गटांनी आपल्या-आपल्या उमेदवारांना प्रचारासाठी रॅली काढली असून, शहराच्या विकासासाठी प्रबळ स्पर्धा दिसत आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी गट सक्रिय असताना राजकारण अधिक तापले आहे.



