गल्लीत गोंधळ, शहरभर राजकीय दंगल
कोणता झेंडा कुणाच्या हाती..? कसरत करावी लागणार हे मात्र नक्की..!!

चिखली (Buldhana) : भाजप आणि काँग्रेस ने नगराध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सस्पेन्स मोडला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार यांनी यावेळी नगराध्यक्ष पद स्वतःच्याच बोन्द्रे कुटुंबियात म्हणजेच काशिनाथ अप्पा बोन्द्रे यांना उमेदवारी देऊन मराठा समाजातील नेतृत्व करणाऱ्या डॉ निलेश गावंडे यांना नाकारले तर निवडणुकीच्या रिंगणता पूर्ण तयारी करून बसलेले डॉ निलेश गावंडे यांनी एनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाशी जुळवून घेत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहे.
तर दुसरीकडे भाजप मध्ये कमालीचे वातावरण दिसून आले. यावेळी अंबिका अर्बन च्या अध्यक्षा डॉ संध्या कोठारी यांच्या नावाला जातीय समिकरणाचा फटका बसून या ठिकाणी पंडितराव देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली तर काँग्रेस मध्ये काशिनाथ अप्पा बोन्द्रे यांना उमेदवारी जाहीर होताच स्व. दीनदयाळ वाधवाणी कुटुंबातील सर्वच सदस्यांनी भाजपामध्ये अधिकृतरित्या प्रवेश करून काही प्रमाणात कांग्रेसची डोकेदुखी वाढवली आहे. तर काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा सौ करुणा किशोर कदम व किशोर कदम, माजी नगरसेवक विलास कंटूले यांनी सुद्धा काँग्रेसची साथ सोडून भाजपचे कमळ हातात घेतल्याची चर्चा जोरात आहे.
नगरसेवक पदासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी गोंधळ उडवला आहे. तर या काळात पक्षनिष्ठेला बगल देत नगरसेवक पदांसाठी उमेदवारी जाहीर झाल्याचे दिसून येणार आहे. तर मोठ्या प्रमाणात बंडखोरी हे चर्चेचा विषय असणार असून त्यांचा राग शमविण्यासाठी सर्वच पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे..
तर मराठा समाजातून अध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आमच्या सामने असून काँग्रेस ने अल्पसंख्याक उमेदवार रिंगणात उतरवले आहे. यामुळे मतांचे विभाजन कसे होणार हे बघण्यासारखे असणार आहे. तर यावेळी वंचित ने कॉंग्रेस सोबत युती केल्याने ताकत काही प्रमाणात वाढली असून राज्यात भाजप सोबत असणारी शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी भाजपसोबत आली युती स्थानिक स्तरावर तोडून सर्वच प्रभागात उमेदवार उतरवणार आहे याचा फटका सरळ सरळ भाजप ला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून निष्ठावानांना डावलून राजकीय समीकरण जुळविण्यासाठी पक्षात नव्याने आलेल्या लोकांना उमेदवारी दिल्याची नाराजी दूर करणे हे भाजप साठी आवश्यक झाले आहे. अल्पसंख्यांक मतांचे विभाजन करण्यात जो सक्षम ठरणार त्याच्या बाजूने निवडणुकीचा निकाल असणार हे वरवर दिसत आहे.
तूर्तास



