छ. संभाजी नगर येथील अपघातातील दे.माळी येथील विवाहितेचा अखेर मृत्यू
सर्व्हिस रोडवर दुचाकी-स्कुटीची समोरा समोर धड

रविंद्र सुरूशे
मेहकर (बुलढाणा) : छत्रपती संभाजी नगर येथील सर्व्हिस रोडवर दुचाकी-स्कुटीची समोरा समोर धडक झाली होती. या धडकेत स्कुटीस्वार महिला गंभीर जखमी झाली होती.हा अपघात शुक्रवारी दुपारी ४ वाजता एएस क्लब रोडवर घडला. बजाजनगरातील द्वारकानगरात राहणारे सुखदेव तुकाराम भराड (५०) यांची पत्नी सौ. राजश्री स्कुटीने ह्या (एमएच-२०-सीसी-२९३६) तिसगावकडून ए.एस. क्लबकडे जात होती. या वेळी समोरुन राँग साईडने आलेल्या दुचाकी (एमएच-२०-सीसी-९२६०) चालकाने सौ.राजश्री सुखदेव भराड यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शर्तीचे प्रयत्न सुरू असतानाच नियतीला हा डाव मान्य नव्हता. अखेर शेवटी 10 नोव्हेंबर सोमवार ला सौ.राजश्री भराड यांनी अखेरचा श्वास घेऊन. त्यांच्या परिवाराला पोरके केले. त्यांच्या पश्चात दोन मुलं, पती, दीर, ननंद, सासू-सासरे, व खूप मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर देऊळगाव माळी तालुका मेहकर येथील शासकीय इंतमात सायंकाळी सात वाजता शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम 12 नोव्हेंबर रोजी सकाळी देऊळगाव माळी येथे ठेवण्यात आला आहे. त्यांच्या जाण्याने देऊळगाव माळी व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या अपघातप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करिता. अपघातातील दे.माळी येथील विवाहितेचा अखेर मृत्यू