चिखली

भाजपमध्ये वैरभाव नाही, एकोप्यानेच विकासाचा व विजयाचा मार्ग सुकर होणार” – विजयकुमार कोठारी

कार्यक्रमानंतर परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली..

Story Highlights
  • केंद्र, राज्य आणि आमदार या सर्व स्तरांवर भाजपाची सत्ता असल्याने चिखली शहराचा विकास वेगाने होत आहे.
  • सर्वसामान्य लोकांमधील सर्वसामान्य चेहरा
  • आपला, हक्काचा, सहज उपलब्ध होणारा असा माणूस
  • “भाजपमध्ये वैरभाव, शत्रुत्व किंवा स्पर्धा नसते..
  • पंडित दादा देशमुख यांच्याबाबत स्थानिकांमध्ये उत्साह...

चिखली (Chikhali, Buldhana) : आज सकाळी प्रभाग क्र.५ मध्ये आ. सौ. श्वेता महाले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदानंद नगर येथील हनुमान मंदिरात प्रचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. प्रचाराचे नारळ ऍड. विजयकुमार कोठारी यांच्या हस्ते फोडण्यात आले. त्यानंतर मदनीशहा वली दर्ग्यावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडित दादा देशमुख व प्रभाग ५ मधील नगरसेवक उमेदवारांनी चादर चढवून आशीर्वाद घेतला. कार्यक्रमानंतर परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली.

चिखली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडित दादा देशमुख आणि स्थानिक नगरसेवक उमेदवारांच्या समर्थनार्थ ही रॅली आयोजित करण्यात आली होती. केंद्र, राज्य आणि आमदार या सर्व स्तरांवर भाजपाची सत्ता असल्याने चिखली शहराचा विकास वेगाने होत आहे व त्याच वेगाने विकास करण्याची संधी निर्माण झाली असून, “नगराध्यक्ष पदही भाजपालाच द्या, विकास करण्यासाठी हीच योग्य संधी आहे,” अशी ग्वाही आमदार श्वेता महाले यांनी यावेळी दिली.

यापूर्वी कधीही न पाहिलेला विकास चिखलीकरांना दाखवण्याची ताकद भाजपामध्ये आहे, असेही त्या म्हणाल्या. पुढे बोलताना त्यांनी पंडित दादा देशमुख यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करताना सांगितले की, “पंडित दादा हे सर्वसामान्य लोकांमधील सर्वसामान्य चेहरा आहे. आपला, हक्काचा, सहज उपलब्ध होणारा असा माणूस. त्यामुळे चिखलीतील जनता त्यांना मनापासून साथ देईल याबद्दल मला बिलकुल शंका नाही.”

प्रचाराचे नारळ फोडताना एडवोकेट विजयकुमार कोठारी म्हणाले, “भाजपमध्ये वैरभाव, शत्रुत्व किंवा स्पर्धा नसते; येथे सहभाव, एकोप्याची भावना आणि परस्पर सहकार्यानेच विकास साधण्याची परंपरा आहे. आम्ही एकमेकांना पुढे नेतो, अडथळे नाही तर मार्ग तयार करतो.”

या रॅलीदरम्यान पंडित दादा देशमुख यांच्याबाबत स्थानिकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. साधेपणा, जनसंपर्क आणि सर्वांना जोडून घेण्याची शैली यामुळे‘सर्वसामान्यांचा सर्वात जवळचा चेहरा’ अशी त्यांची ओळख अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसले. प्रभाग ५ मधील नागरिकांमध्ये उमेदवारांविषयीचा सकारात्मक प्रतिसाद या प्रचार रॅलीतून स्पष्टपणे जाणवला…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button