प्रशासनमहाराष्ट्र समाचार

रविवारी उमेदवारी अर्ज भरता येणार नाही

१५ नोव्हेंबर २०२५ रोजी ११ ते ३ वाजेपर्यंत अर्ज भरावे लागणार

बुलढाणा : राज्यातील २४३ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून नामनिर्देशन पत्र सादर करायचा कालावधी सुरू झाला आहे. सर्व संदर्भातील निवडणूक कार्यक्रमांमध्ये रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र शिकवण्यात येणार नाही, असे नमूद आहे. त्यामुळे शनिवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात यावेत का, या संदर्भात विचारणा होत आहे.
या अनुषंगाने नामनिर्देशन पत्र सादर कराच्या कालावधीत₹तील शनिवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ या दिवशीही सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात यावे तसेच याबाबत सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून तातडीने कळविण्यात यावे, असे आदेश राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र चे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी एका पत्राद्वारे जिल्हाधिकारी (सर्व – मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता), मुख्याधिकारी (सर्व संबंधित) यांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button