चिखलीराजनीति

विचारांची परंपरा, विकासाची हमी…

प्रभाग ६ मधून सौ. कविता रेणुकादास मुळे यांच्या पाठीशी सर्वसामान्य मतदार

चिखली (बुलढाणा) : चिखली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. ६ (सर्वसाधारण महिला) या गटातून भारतीय जनता पक्षाकडून सौ. कविता रेणुकादास मुळे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. पक्षनिष्ठा, सामाजिक कार्य आणि विचारशील नेतृत्व या तिन्ही गुणांचा संगम असलेल्या कविता मुळे यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

समाज कार्याचा मजबूत पाया

सौ. कविता मुळे या शहरातील सुप्रसिद्ध पत्रकार व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराने प्रेरित असलेले कार्यकर्ते रेणुकादास मुळे यांच्या पत्नी असून, सध्या त्या भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या शहर कार्याध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानमध्ये संचालिका म्हणून त्या कार्यरत आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दोघेही सक्रिय असून, नागरिकांशी थेट संपर्क व लोकाभिमुख कार्य करण्याची त्यांची ओळख आहे. सौ कविता मुळे यांनी आपल्या पतीच्या कार्यात खांद्याला खांदा लावून सातत्याने सहभाग घेतला आहे.

पदाचा नव्हे तर विचारांचा वारसा

मुळे परिवाराला पदाचा नव्हे, तर विचारांचा वारसा लाभला आहे. रेणुकादास मुळे यांचे वडील, स्व. दत्तात्रय शंकरराव मुळे, हे तत्कालीन भारतीय जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून आजही आदराने स्मरणात आहेत. तहान – भूक व सर्वस्वाचे भान विसरून पक्षकार्यात झोकून देण्याचे स्व. दत्तात्रय मुळे यांचे किस्से आजही ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते सांगतात. रेणुकादास मुळे हे देखील बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढले. जुने गाव परिसरातील सोमनाथ शाखेची मुहूर्तमेढ रोवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. याशिवाय अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद, स्वदेशी जागरण मंच, सामाजिक समरसता मंच, अशा संघ परिवारातील विविध संघटनांमध्ये रेणुकादास मुळे यांनी धडाडीने कार्य केले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये सोशल मीडिया जिल्हा संयोजक व सोशल मीडिया सेलचे अमरावती विभाग सहसंयोजक या जबाबदाऱ्या देखील अतिशय प्रभावीपणे त्यांनी पार पाडल्या आहेत. भाजपाच्या प्रदेश स्तरावरील मीडिया वॉर रूममध्ये माध्यम समन्वयक म्हणून त्यांनी कार्य करण्याचा त्यांना अनुभव आहे. हीच विचारांची परंपरा कविता मुळे पुढे नेत आहेत. भगवती गृह उद्योग या आपल्या गिरणी व्यवसायाच्या माध्यमातून जुने गाव परिसरातील विविध स्तरातील माता – भगिनी व प्रभागातील सर्व समाजघटकांशी त्यांचा आत्मीयतेचा आणि विश्वासाचा संबंध आहे. त्यामुळेच त्यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच जनतेचा पाठिंबा त्यांच्याभोवती उभा राहिलेला दिसतो.
लोकाभिमुख कार्यशैली

सौ. कविता रेणुकादास मुळे या सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीतून पुढे आलेल्या असूनही, सामाजिक कार्य करण्याची जिद्द, समस्यांचे समाधान करण्याची तळमळ, आणि हाती घेतलेले काम तडीस नेण्यासाठी हवे ते कष्ट उपसण्याची तयारी ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. एखाद्या विषयाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याची चिकाटी व लोकांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याची वृत्ती यामुळे त्यांची प्रतिमा जनतेच्या मनात अधिक दृढ होत आहे.
विकासाचा संकल्प

“पक्षाने विश्वास ठेवून उमेदवारी दिल्यास, जनतेच्या आशीर्वादाने निश्चित विजय संपादन करू व चिखली मतदार संघाच्या भाग्यविधात्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. ६ चा सर्वांगीण विकास घडवून आणू,” असा दृढ विश्वास सौ. कविता मुळे आणि त्यांचे पती श्री रेणुकादास मुळे व्यक्त करतात. जनतेतूनही खऱ्या अर्थाने नगरसेवक पदाच्या जबाबदारीला न्याय देऊ शकणारा, पक्षाशी एकनिष्ठ व सर्वसामान्य कार्यकर्ता असलेला नवा चेहरा म्हणून सौ कविता रेणुकादास मुळे यांनाच आमदार सौ श्वेताताई महाले यांचे भक्कम पाठबळ व भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळेल आणि त्या भरघोस मतांनी विजयी होतील अशी सकारात्मक प्रतिक्रिया उमटताना दिसते.

प्रेरणास्थान : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सौ. कविता रेणुकादास मुळे यांच्या उमेदवारीचा गाभा म्हणजे विचारांवर चालणारे नेतृत्व होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. “ज्याच्याकडे विचार नाही, त्याच्याकडे दिशा नसते; आणि दिशा नसलेल्या समाजाचा विकास कधीच होत नाही.” या विचारांचा प्रत्यय सौ. कविता मुळे यांच्या कार्यात स्पष्ट दिसतो. त्या राजकारणात पदासाठी नव्हे, तर विचारांच्या बळावर समाजसेवेच्या माध्यमातून परिवर्तनासाठी उतरल्या आहेत. विचारांना कृतीचे रूप देणारी ही उमेदवारी जनतेत नवचैतन्य निर्माण करणारी ठरत आहे.
प्रामाणिकता, कार्यतत्परता आणि विचारनिष्ठा या तीन स्तंभांवर उभी असलेली सौ. कविता रेणुकादास मुळे यांची उमेदवारी ही फक्त एका प्रभागाची नव्हे, तर विचारांच्या विजयाची घोषणा आहे. भाजप पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणे म्हणजे प्रभागाला विकासाची दिशा मिळण्याची सुरुवात ठरेल, यात शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button