मतदानाच्या दोन दिवस आधीच घडीचा धडाका, ‘उठो पकडो भागो’चा धक्का….!!!
अनेक प्रभागांवर वर्चस्व, युतीची ताकद विरोधकांना धक्का देणारी..

- चिखली रणभूमीत गावंडेंचा 'घड्याळ काटा' वेगवान! राष्ट्रवादीचा विजयी रथ धावतोय..
- "उठो पकडो भागो घडी काटे भागे" हे गाणे संदेश देणारे ठरत आहे.
चिखली नगरपरिषदेच्या २०२५ च्या निवडणुकीत तिरंगी लढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) युतीचे नगराध्यक्ष उमेदवार प्राचार्य निलेश गावंडे यांचा प्रचार आता सेकंदाच्या गतीने धावत आहे. मध्यंतरी संथ झालेला घड्याळाचा तास काटा पुन्हा वेगवान झाला असून, निवडणुकीच्या दोन दिवस आधी रणनीती पूर्णपणे बदलल्याने १४ प्रभागांपैकी अनेक प्रभागांवर त्यांचे वर्चस्व पक्के झाले. घड्याळ काट्यासारखा सतत गती ठेवावी हीच गावंडे यांची रणनीती यशस्वी ठरू पाहत आहे.

राजकारणात कायम काही नसते हे सत्य ठरत असून, स्थानिक कार्यकर्ते पक्षापेक्षा उमेदवाराकडे जास्त लक्ष देत आहेत. गावंडे यांच्या नेतृत्वाखाली संधी आली की सापडते या तत्त्वाने लोकसमर्थन वाढले असून, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा मुद्द्यांवर दिलेले आश्वासन मतदारांना आकर्षित करत आहे. विरोधकांसाठी मात्र ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातील “उठो पकडो भागो घडी काटे भागे” हे गाणे संदेश देणारे ठरत आहे.
मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात डोळ्यात तेल ओतून एकजुटीने काम करत समर्थक एका हाताला ताली कशी येईल या भावनेने एकत्र येत आहेत. राष्ट्रवादी-शिवसेना युतीची ताकद निकालात स्पष्ट होईल, तर दोन जाणार एकच येईल असा धक्का इतर उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. चिखलीतील विकासाच्या मुद्द्यांवर गावंडे यांचे वचनभंग होणार नाही, हे लोकांच्या मनात रुजत चालले आहे.

तर मंत्री माणिकराव कोकाटे व राष्ट्रवादी आमदार सना मलिक यांनी मुस्लिम समाजाला भेटून जागरूक मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत एकजुटीने मतदान करण्याचा संदेश दिला. त्यांनी स्पष्ट सांगितले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कोणीही, कोणत्याही समाजाची व्यक्ती तक्रार घेऊन आल्यास त्या समस्यांचे निराकरण प्राथमिकतेने केले जाते. यावेळी समस्या आणणाऱ्याची जात-पात, धर्म कधीच पाहिला जात नाही!” हे वक्तव्य विशेषतः अल्पसंख्यांक समाजात चांगलेच व्हायरल झाले असून, सोशल मीडियावर असंख्य लोक त्यावर बोलत आहेत. या भावनिक आवाहनाने मतदारांमध्ये “एका हाताला ताली कशी येईल?” ही एकजुटीची भावना निर्माण झाली आहे.

निवडणुकीत मतदारांचा कौल कुणाकडे हे लवकरच म्हणजे ३ डिसेंबर रोजी स्पष्ट होणारच आहे. तरी सर्वांनी आपले मतदानाचे हक्क बजवावे कारण राष्ट्र निर्मितीसाठी ते महत्वाचे आहे.



