Blog

शीत लहरीच्या प्रकोपात पशुपालकांनी काय करावे….. करू नये…..

शीत लहरींपासून पशुधनाचा बचाव करणे आवश्यक..

सध्या थंडीचे प्रमाण वाढत असून याम शीत लहरीच्या प्रकोप्रात शेतकरी व पशुपालक यांच्या पशुधनाचे आर्थिकदृष्ट्या नुकसान होऊ नये यासाठी शीत लहरींपासून पशुधनाचा बचाव करणे आवश्यक आहे. शीत लहरींच्या प्रकोपाच्या तीव्रतेपासून संरक्षण करणे, अनुषंगिक आजार व मर्तुक नियंत्रीत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना उपयुक्त आहेत याविषयी जाणून घेऊया…..

शीत लहरीमध्ये नवजात वासरे, कालवडी / गोऱ्हे / वगारी / रेडक / मेंढ्या व शेळ्यांचे करडं, आजारी पशुधन तसेच श्वसन संस्थेचे विकार असलेले पशुधन, दुभते पशुधन, अशक्त पशुधन हे उच्चतम जोखीम असलेले पशुधन आहे. शीतलहरीमुळे होणाऱ्या हायपोथर्मिया, फ्रॉस्ट बाईट, भूक मंदावणे, मोठ्या पशुधनात सांधे दुखी, कुत्र्यांच्या पिलात खोकला, श्वसन विकार आदिंवर उपाययोजना पुढीलप्रमाणे आहेत.

काय करावे

  1. स्थानिक हवामानाच्या अंदाजाची अद्यावत माहिती ठेवावी.
  1. वातावरणातील तीव्र बदलापासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तयारी करून ठेवावी.
  1. पशुधनाचा थंड वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी त्याचा निवारा चहू बाजूने आच्छादित करावा, पत्र्याचे छत असल्यास त्यावर वाळलेले गवत अथवा कडब्याचा थर पसरावा तसेच पशुधनास निवाऱ्यातील जमिनीतील थंडी पासून बचावासाठी वाळलेल्या चाऱ्याचा थर / बिछाना अंथरावा.
  1. पशुधनाचा निवारा शीत ऋतुत जास्त सुर्य प्रकाश पुरविणारा व उन्हाळ्यात सुर्य किरणांच्या तिव्रतेपासून बचाव करणारा असावा.
  1. कडाक्याची थंडी असल्यास निवाऱ्यात कृत्रिम प्रकाश व उष्णता पुरवायची सोय करावी.
  1. अशक्त व आजारी पशुधनास थंडी पासून बचावाकरीता झाकण्यासाठी पोती / बारदान यासारखी सोय असावी. तसेच रात्री सर्व पशुधन उबदार निवाऱ्यात ठेवावे.
  1. पशुधनास ओलाव्यापासून दूर ठेवावे, तसेच उष्णतेसाठी शेकोटी पेटविली असेल तर त्यापासून निघणाऱ्या धूरापासून त्यांचा बचाव करावा, ओलसरपणा ओलावा व धूर यामुळे पशुधनास न्युमोनिया होण्याची शक्यता असते.
  1. पशुधनाच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहावे यासाठी विशेष करून लहान वयाच्या व अशक्त पशुधनास पेंड व गुळ देण्यात यावे. तसेच त्यांना उबदार जागी ठेवण्याची सोय असावी.
  1. पशुधनासाठी उच्च दर्जाच्या चारा व पशुखाद्याचा मुबलक साठा असावा.
  1. सुधारीत पशुपोषण पध्दती व पुरक खाद्य वापरावेत.
  1. पशुधनास जंत / कृमी नाशके देण्यात यावे.
  1. पशुधनांचा बाह्यपरजीवी किटकांपासून बचाव करण्यासाठी त्यांच्या निवाऱ्यात स्वच्छता ठेवावी तसेच निरगुडी, तुळस, लेमन ग्रास यांच्या जुड्या गोठ्यात लटकवाव्या, त्या वासाने बाह्य परजीवीं किटक पशुधनाच्या निवाऱ्यात येण्याची शक्यता कमी होते, निवान्याच्या / गोठा स्वच्छतेसाठी कडूनींबाचा तेल असलेले निर्जंतुकीकरण द्रावण वापरता येईल.
  1. पशुधनाच्या संवर्गानुसार लाळ खुरकुत, घटसर्प, फऱ्या, पीपीआर, आंत्रविषार, इत्यादी रोग प्रतिबंधक लस देण्यात यावी.
  1. पशुखाद्यातून व पाण्यातून पुरेसे क्षार पुरविण्यात यावेत. दुभत्या पशुधनास संतुलित्त आहार व पुरक स्निग्ध खाद्य पुरविण्यात यावेत.
  1. पशुधनाच्या पाणी पिण्याची भांडी स्वच्छ असावित तसेच पशुधनास दिवसातुन 4 वेळेस कोमट पाणी पिण्यास द्यावे.
  1. सहा महिन्या पुढील गर्भधारणा असलेल्या पशुधनास वाढीव खाद्य द्यावे.
  1. पक्षांच्या पिंजऱ्यांचे तापमान नियंत्रित राहण्याकरीता आवश्यक ती उपाययोजना करावी,
  1. मृत पशुधनाच्या विल्हेवाटीची जागा ही सार्वजनिक जागा व पाणवठ्यापासून दूर असावी. तसेच ती जागा काटेरी कुंपनाने संरक्षित असावी आणि तेथे फलक लावण्यात यावा.

काय करू नये

  1. शीत लहरीच्या काळात पशुधनास उघड्यावर बांधू नये, तसेच मोकाट सोडू नये.
  1. शीत लहरीमध्ये पशु मेळाव्यांचे आयोजन टाळावे.
  1. पशुधनास पिण्यास थंड पाणी देऊ नये.
  1. पशुधनाच्या निवाऱ्यात ओलसरपणा व धूर टाळावा.
  1. रात्री व थंडीत पशुधनास उघड्यावर बांधून ठेऊ नये.
  1. मृत पशुधनाचे शव कुरणावर अथवा चरावयाच्या मार्गात टाकू नये.

       या सर्व उपाय योजनांसोबतच शेळी-मेंढी-कुक्कुटपक्षांमध्ये शीत लहर कालावधीत पुढीलप्रमाणे काळजी घेण्यात यावी.

शीत लहरीच्या कालावधीत शेळ्या मेंढ्यांची घ्यावयाची काळजी

  1. स्थलांतर करणाऱ्या व रानात शेळी-मेंढी बसवणाऱ्या पशुपालकांनी विशेष खबरदारी घ्यावी. शक्यतो पशुधनास बंदीस्त उबदार निवारा मिळेल याची दक्षता घेण्यात यावी.
  1. शेळ्या मेढ्यांना रानात बसवले असेल तर उबदार आच्छादने लपेटावीत.
  1. शरीरात लवकर उर्जा निर्माण होण्यासाठी कर्बोदक युक्त खाद्य प्राधान्याने देण्यात यावे परंतु अॅसिडोसिस होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
  1. शीत लहरीच्या काळात मेंढ्यांची लोकर कापणी थांबवावी.
  1. वेळापत्रकानुसार लसीकरण करून घ्यावे.
  1. आवश्यक औषधी व जिवनसत्वे यांचा साठा ठेवावा.

शीत लहरीच्या कालावधीत कुक्कुट पक्ष्यांची घ्यायची काळजी

  1. पक्षी शेड मध्ये दोन्ही बाजूच्या जाळ्यांना पडदे लावून रात्री व पहाटे थंड हवेच्या वेळी बंद करावे. उन्हाच्या वेळी / दुपारी पडदे उघडावेत.
  1. पक्षीगृहात तापमान नियंत्रणाची सोय असावी.
  1. पक्षीघरातील तपमान (21 ते 23 डि. से.) नियंत्रीत राहणे आवश्यक असते, त्यामुळे शेडमध्ये विजेचे बल्ब, शेगडी किंवा ब्रुडरचा वापर करावा.
  1. हवामानातील बदलामुळे पक्षांवर ताण येवू नये म्हणून त्यांच्या आहारात इलेक्ट्रोलाइटस, जिवन सत्वे, इत्यादींचा वापर करावा.
  1. अति थंडीमुळे हवेतील आर्द्रता वाढून पक्षांची गादी, खाद्य यामध्ये बुरशीची वाढ होवून पक्षांना श्वसनाचे रोग होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पक्षी घरातील गादी स्वच्छ व कोरडी राहील याची खबरदारी घेण्यात यावी.
  1. पक्षांना पिण्यासाठी कोमट पाणी पुरवावे.
  1. उर्जेची गरज वाढल्यामुळे आवश्यकतेनुसार पोषण तज्ञाच्या सल्ल्याने खाद्य तयार करून घ्याचे.
  1. वेळापत्रकानुसार लसीकरण करून घ्यावे.
  1. पुरेसा औषधी, क्षार मिश्रणे व जिवनसत्वे यांचा साठा ठेवावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button