श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दत्तजयंती उत्साहात साजरी
खिचडी महाप्रसादाची २५ वर्षांची परंपरा कायम..

- खिचडी महाप्रसादाची २५ वर्षांची परंपरा कायम..
- श्री दत्तजयंती मोठ्या भक्तीभावाने साजरी ...
- भजन, नामस्मरण, सद्गुरू स्तोत्र पठण व महाआरतीने वातावरण भक्तिमय झाले. ..
खामगाव (जिल्हा बुलढाणा) : शहरातील सतिफैल भागात श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने गुरुवार, ४ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी श्री दत्तजयंती मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली. मंडळाचे सदस्य विनोद सुकाळे यांच्या निवासस्थानी हा धार्मिक सोहळा पार पडला.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा मार्गदर्शक देविदास शर्मा यांच्या संकल्पनेतून गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या खिचडी महाप्रसाद वाटपाच्या परंपरेचे यंदाही श्रद्धेने दर्शन घडले. संध्याकाळी ५ वाजता श्री सद्गुरू एकनाथ महाराज आणि श्री दत्तभगवान यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर भजन, नामस्मरण, सद्गुरू स्तोत्र पठण व महाआरतीने वातावरण भक्तिमय झाले. भाविकांना खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.

या वेळी विनोद सुकाळे, दिलीप झापर्डे, अरुण कडवकर, सुशीला आवलकर, शकुंतला ढवळे, जयश्री झापर्डे, जया सुकाळे, बेबी आवलकर, उज्ज्वल सुकाळे, छकुली सुकाळे, मनमितकौर चव्हाण, बुंदेले यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
वर्षभरात मंडळातर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, गरिबांना भोजन व कंबल वाटप, पक्ष्यांसाठी पाणपात्र वाटप असे अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जातात. या समाजकार्याची दखल घेऊन यंदा देविदास शर्मा यांना अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.
