चिखलीतील बर्बरीक मित्र मंडळाच्या वतीने भव्य निशाण यात्रा आणि खाटू श्याम भजन संध्या उत्साहात संपन्न
खाटू श्याम देवाच्या भव्य भजन संध्याचे आयोजन..

- कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने नागरिकांनी प्रतिसाद दिला.
- कार्यक्रमस्थळी जाणे-येणे करीता शहरातील विविध भागातून बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.
- भक्तिमय वातावरणात निघालेल्या निशाण यात्रेत मोठ्या संख्येने महिला, पुरुष, व तरुणांचा समावेश लक्षणीय होता...
चिखली : श्री बर्बरीक मित्र मंडळ, चिखली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य निशाण यात्रा आणि खाटू श्याम भजन संध्या अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाली.
दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी चार वाजता परमहंस रामकृष्ण मौनी बाबा येथून या निशाण यात्रेची सुरुवात झाली. यात्रा श्रीराम मंदिर, राजा टॉवर, रामदासी दीनदयाल नगर, राऊतवाडी बस स्टॉप, सिद्ध सायन्स मंदिर, जालना रोड, गांधी नगर आणि डॉ. गुप्ता हॉस्पिटल या प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली. दर्शनासाठी मार्गावर शेकडो भाविक सामील झाले होते.

यानंतर दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता जालना रोड वर स्थित महाराजा अग्रसेन रिसॉर्ट येथे खाटू श्याम देवाच्या भव्य भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध भजन गायिका ऋषिका ठाकूर (ग्वाल्हेर), आकाश यादव (नागपूर) आणि कार्तिक बुधवाणी (खामगाव) यांची सुमधुर भजने सादर झाली. भाविकांनी या भक्तिरसात रंगून कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला.


कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. महिला, पुरुष आणि लहान मुलांचा सहभाग विशेष लक्षणीय राहिला. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.





