चिखलीत फडणवीस यांची भव्य सभा; नगराध्यक्षपदाच्या लढतीस नवे वारे
ही सभा निवडणुकीतील सर्वात मोठी आणि निर्णायक ठरणार..

- राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता..
- तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये सध्या जबरदस्त उत्साह..
- देशमुख यांच्या प्रचाराला नवसंजीवनी..
- ही सभा निवडणुकीतील सर्वात मोठी आणि निर्णायक ठरणार..
चिखली : चिखली नगरपरिषद निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजपकडून मोठा राजकीय शंखनाद होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप उमेदवार पंडितराव देशमुख यांच्या प्रचारासाठी भव्य सभेत सहभागी होणार आहेत.
ही सभा 25 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता चिखलीत आयोजित करण्यात आली आहे.
चिखली विधानसभा क्षेत्राच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार पंडितराव देशमुख यांच्या केंद्रस्थानी होणारी ही सभा निवडणुकीतील सर्वात मोठी आणि निर्णायक ठरणार असल्याची उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, या सभेमुळे चिखलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. भाजप आपल्या शक्तीचे प्रदर्शन करून नगरपरीषदेच्या निवडणुकीत वर्चस्व सिद्ध करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र समोर आले आहे.
भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये सध्या जबरदस्त उत्साह आहे. फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे पंडित राव देशमुख यांच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळेल, असा पक्षातील कार्यकर्त्यांचा विश्वास आहे



