विजयकुमार कोठारींच्या वक्तव्याने चिखलीच्या राजकारणात नवा अध्याय
राजकीय क्षेत्रात त्यांच्याप्रती सुरू असलेली उलटसुलट चर्चाना वेगळेच वळण..

- तिकीट न मिळूनही पक्षनिष्ठा कायम..
- भाजपनं तिकीट न दिलं तरी विजयकुमार कोठारींची निष्ठा ढळली का?पक्षाच्या निर्णयावर ठाम राहणारे विजयकुमार कोठारी — खऱ्या कार्यकर्त्याचं उदाहरण
- विजयकुमार कोठारींची पक्षनिष्ठा भाजपसाठी आदर्श ठरणार..
- भाजपची रणनीती की कार्यकर्त्यांचा विश्वास
चिखली (बुलढाणा) : नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने चिखली मध्ये भाजप तर्फे मुख्य दोन इच्छूक उमेदवार पक्षाचे तिकीट प्राप्त करण्यासाठी इच्छूक होते. यामध्ये प्रदेश कार्यकारणी सदस्य विजयकुमार कोठारी यांच्या पत्नी डॉ सौ संध्या कोठारी व पंडितराव देशमुख यांचा समावेश होता. नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या घटकापर्यंत भाजप ने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर न केल्याने शहरभर कमालीची चर्चा रंगत होत्या. शेवट अखेर पक्षाने एनवेळी राजकीय समीकरण बघता पंडितराव देशमुख यांना उमेदवारी जाहीर करून आपला मौन सोडला परंतु यावेळेस कोठारी यांना उमेदवारी न मिळाल्याच्या कारणावरून राजकीय क्षेत्रासह शहरभर अनेक तर्क वितर्क लढवून गोष्टी रंगू लागल्या. परंतु आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विजयकुमार कोठारी असे काही बोलले की ज्याने राजकीय क्षेत्रात त्यांच्याप्रती सुरू असलेली उलटसुलट चर्चाना वेगळेच वळण मिळाले अन खर काय ते समोर आले. भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विजयकुमार कोठारी यांनी मोठा गौप्यस्फोट करून चिखलीच्या राजकारणात विरोधक आणि कार्यकर्त्यांना संदेश तर दिलाच परंतु पक्षाप्रती कार्यकर्त्यांची जबाबदारी व दिशा बदलून दिली आहे.
“पक्षाने तिकीट न दिलं, याची खंत नाही; पक्षनिष्ठा आणि पंडितरावांवर विश्वास हेच आमचं बळ,” असा ठाम विश्वास भाजप कार्यकारिणी सदस्य विजयकुमार कोठारी यांनी व्यक्त केला.

पक्षनिष्ठा व रणनीती
भाजपने तिकीट न दिल्याने काहीही फरक पडत नसल्याचे कोठारी यांनी स्पष्ट केले.
ही पक्षाची आखलेली रणनीती असून, अन पंडितराव आणि कोठारी हे दोघेही स्वतःच्या स्तरावरून सातत्याने प्रचार करत असल्याने विरोधक गोंधळात राहिले, असे ते म्हणाले.
५० वर्षांची कार्यकर्त्यांची जोडी
गत जवळपास ५० वर्षांपासून पंडितराव आणि कोठारी पक्षासाठी अखंडपणे कार्यरत आहेत.
“आम्ही दोघेही प्रथम पक्षाचे कार्यकर्ते आहोत; पक्ष जो आदेश देईल, त्यालाच प्राधान्य देतो,” अशा शब्दांत त्यांनी आपली निष्ठा स्पष्ट केली.

पंडितरावांची नगराध्यक्ष पदासाठी शिफारस
पंडितराव हे नगराध्यक्ष पदासाठी सर्वार्थाने योग्य उमेदवार असल्याचे कोठारी यांनी ठामपणे सांगितले.
जमिनीशी नातं जुळलेला स्वभाव, नगरपरिषद प्रशासनाचा चांगला अभ्यास आणि ‘सबका साथ, सबका विकास’ ही भूमिका लक्षात घेऊन चिखली नगरपरिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनाच निवडून देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
तिकीट न मिळाल्याबाबत प्रतिक्रिया
“मला तिकीट मिळालं नाही, हा प्रश्नच नाही; पक्षाने घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम असतो,” असे कोठारी यांनी सांगितले.
या निर्णयाला मान देत आपण संपूर्ण ताकदीने पंडितरावांच्या पाठीशी उभे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



