चिखली

मौजे मनुबाईतील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात मोठ्या उत्साहात प्रवेश

विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवून भाजपचा झेंडा हाती...

चिखली (बुलढाणा) : चिखली तालुक्यातील मौजे मनुबाई येथील असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करून विकासाच्या प्रवाहात सामील होत पक्षाच्या बळकटीकरणाला हातभार लावला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख धोरणांवर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

हा  सोहळा चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आमदार श्वेता महाले पाटील यांनी सर्व नवप्रवेशितांचे मनःपूर्वक स्वागत करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “विकास हाच आमचा धर्म आणि सेवा हाच आमचा संकल्प,” असे सांगत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना जनतेशी जोडून काम करण्याचे आवाहन केले.

मौजे मनुबाई येथील सरपंच सुखदास वायाळ, सुनील वायाळ, मधुकर वायाळ, कान्होबा वायाळ, प्रताप वायाळ, अक्षय वायाळ, गणेश वायाळ, बद्रिनाथ वायाळ, पुरुषोत्तम वायाळ, भगवान इंगळे, लक्ष्मण जाधव, शरद वायाळ, राजू वायाळ, मदन वायाळ, सागर वायाळ, पवन पडघान यांनी आज पक्षप्रवेश करून भाजपा परिवाराचा भाग बनले.

या कार्यक्रमामुळे चिखली मतदारसंघात भाजपाची संघटनात्मक ताकद आणखी दृढ झाली असून “सबका साथ, सबका विकास” या ध्येयधोरणाची नवी पायरी यावेळी गाठली गेली आहे. या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, शहराध्यक्ष सागर पुरोहित, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button