ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचा भाजपला जाहीर पाठिंबा

- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव आणि भाजपची सकारात्मक भूमिका
- चिखली नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार पंडितराव देशमुखांना पाठिंबा..
- श्वेताताई महाले पाटील यांचा अहिल्यादेवी स्मारकासाठी महत्त्वाचा वाटा..
- मोदी व फडणवीस सरकारच्या बारा ज्योतिर्लिंग आणि अहिल्यानगर मोहिमांचे गौरव३०० कोटींच्या अहिल्यादेवी स्मारकाला मंजुरी, धनगर समाजासाठी विविध योजना..
चिखली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा सन्मान आणि धनगर समाजासाठी भाजपने घेतलेला सकारात्मक दृष्टिकोन पाहता, ‘ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने’ भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे. महासंघाने चिखली नगरपरिषद निवडणुकीतील भाजपचे अधिकृत उमेदवार पंडितराव देशमुख यांना पाठिंबा देत असल्याचे अधिकृत पत्र जारी केले आहे.
महासंघाचे राष्ट्रीय सचिव व भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य, डॉ. पंकज भिवटे यांनी दिल्ली येथील मुख्य कार्यालयातून पत्र सोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजपने हिंदू धर्म रक्षणासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाला उजाळा दिला आहे, आणि हा सकारात्मक दृष्टिकोन महासंघाच्या पाठिंब्याचा प्रमुख कारण आहे.

पत्रात असेही नमूद आहे की, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी अहिल्यादेवींच्या आदर्शावर काम केले असून, चिखली बसस्थानकाजवळील जागा स्मारकासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल महासंघाने त्यांचे आभार मानले आहेत. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांमध्ये अहिल्यादेवींच्या मूर्ती स्थापन केल्या आणि ३०० व्या जयंतीनिमित्त वर्षभर कार्यक्रम आयोजिले. याशिवाय, देवेंद्र फडणवीस सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण ‘अहिल्यानगर’ केले आणि चौंडी येथे स्मृतीस्थळ संवर्धनासाठी ६८१ कोटींचा आराखडा मंजूर केला आहे.भाजपच्या अनेक राज्य सरकारांनी धनगर समाजासाठी विविध योजना राबविल्या असून, या वर्षी इंदूर येथे ३०० कोटींच्या स्मारकाची घोषणा करण्यात आली आहे. महासंघाचा असा विश्वास आहे की, अहिल्यादेवींच्या कार्याच्याच आदर्शावर भाजप सरकार वाटचाल करत आहे.
महासंघाने पंडितराव देशमुख यांना नगराध्यक्ष म्हणून अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभारण्याचे आणि धनगर समाजाच्या समस्यांना प्राधान्याने हाताळण्याचे आवाहन केले आहे. या निर्णयाला केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री प्रा. एस.पी. सिंह बघेल आणि विधानपरिषद सभापती प्रा. ना. ना. रामराजे रामराजे शिंदे यांनी मार्गदर्शन केले आहे.
ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजयपाल सिंह होळकर यांच्या नेतृत्वाखाली, महासंघाने भाजपला आगामी सर्व सकारात्मक विकासकार्यांसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.



